डेंगीचे रूग्ण वाढताहेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगीचे रूग्ण वाढताहेत!
डेंगीचे रूग्ण वाढताहेत!

डेंगीचे रूग्ण वाढताहेत!

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः शहरात डेंगी आजाराने डोके वर काढले आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ४ हजार ४६८ डेंगी सदृश्य रुग्ण आढळले आहेत. यापैकी २०१ रूग्ण डेंगी बा​धित सापडले आहेत. गेल्या तीन महिन्यांची वाढती आकडेवारी पाहता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविल्या जात नसल्याची ओरड होत आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी खासगी रूग्णालयात शिक्षक तरुणीचा डेंगीमुळे मृत्यू झाला आहे. पण, याची नोंद महापालिका रूग्णालय दप्तरी नसल्याने रुग्णांचा आकडा अधिक असल्याचा शक्यता व्यक्त होत आहे.

हवामानातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया व काविळीचे रुग्ण आढळत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत ६ हजार ६४२ डेंगीसदृश्य आढळून आले आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील भरलेले कोंडाळे, साचलेल्या गटारी स्वच्छ केला जात नसल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. काळेवाडी, नेहरू नगर, अजमेरा कॉलनी, थेरगाव, रहाटणी, आकुर्डी, अशा विविध भागात रूग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात ३ हजार ९८६ रुग्ण डेंगी सदृश आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळले आहे. त्यांच्यापैकी २०१ रूग्णांना डेंगी झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी महिन्यात दोन रूग्ण सापडले होते. जूनपाठोपाठ १७, जुलैमध्ये ३७, ऑगस्टमध्ये ३६, सप्‍टेंबरमध्ये ९८, ऑक्टोबरमध्ये ८९ आणि नोव्हेंबरमध्ये १४ डेंगी आढळून आले आहेत. सलग रुग्ण आढळल्याने तीव्रता वाढल्याचे दिसत आहे.

कोट
‘‘शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. डेंगी होण्यास कारणीभूत असणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात औषध फवारणीची केली जाते. मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो यासारख्या आजाराचे रुग्ण आढळल्याच्या नोंदी नाहीत. स्वच्छतेला प्राधान्य देताना खबरदारी म्हणून गॅरेज, सोसायटींची स्वच्छता केली जाते. ’’
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका

- काय काळजी घ्यावी
पाणी उकळून प्या
घराचा परिसर स्वच्छ ठेवा
जुन्या टायर साठवू नका
डासांची निर्मितीची ठिकाणे नष्ट करा
खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी बसवा
पाण्याची भांडी व्यवस्थित ठेवून त्यावर झाकणे बसवा

आकडेवारी
महिना - संशयित - बाधित - मृत्यू
-जानेवारी -१५० -२- ०
-फेब्रुवारी - ५८ - ०-०
-मार्च - ५७ -०-०
-एप्रिल - ८६ - ०-०
-मे -११९ -०-०
-जून - २९९ -१७ -०
-जुलै -५०३ -३७ -०
-ऑगस्ट ९०२- ३५ -०
सप्टेंबर - २११० - ९८-०
ऑक्‍टोबर - १८७६ - ८९-०
नोव्हेंबर -४८२ - १४ - ०