जंगलांचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंगलांचे नुकसान करणाऱ्यांवर
कठोर कारवाईचा इशारा
जंगलांचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

जंगलांचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ८ ः जंगलांच्या अस्तित्वाला धोका पोहचविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिला असून, स्थानिक नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाच्या जंगलसंवर्धन विभागाच्या प्रयत्नामुळे गेल्या तीन दशकांत पवन मावळातील सोमाटणे ते खंडाळा, कासारसाई ते कुसगाव दरम्यानच्या डोंगररांगांत मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढली आहेत. तसेच कासारसाई, पवना, मळवंडी भुशी धरणाचा परिसर, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्यांच्या सभोवताली घनदाट जंगले वाढलेली आहेत. परंतु जंगलाच्या जवळून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग गेल्यानंतर जंगलाजवळ माणसांचा वावर वाढला. याचा परिणाम जंगलात कचरा टाकणे, तो पेटवणे, झाडे तोडणे आदी प्रकार सुरू झाल्याचे समजताच वनविभागाने जंगलाकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. जंगलांचे नुकसान करण्याचा प्रकार कोणी केल्यास त्यावर कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. जंगलांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेण्यात येत असून, असा गैरप्रकार निदर्शनात आल्यास नागरिकांनी आपले कर्तव्य समजून वनविभागाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंतराव जाधव यांनी केले आहे.