कार्तिकस्वामींचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिकस्वामींचे दर्शन
कार्तिकस्वामींचे दर्शन

कार्तिकस्वामींचे दर्शन

sakal_logo
By

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त श्री कृष्ण मंदिर, निगडी येथील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये सोमवारी (ता. ७) दुपारपासून दर्शन सुरू झाले. कार्तिकी पौर्णिमा सोमवारी दुपारी ४ वाजून १७ मिनिटांनी सुरू झाली. त्यानंतर कार्तिक स्वामी उत्सव सुरू झाला. मंगळवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजून ३२ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त झाली. यावेळी भाविकांनी मोरपीस घेऊन दर्शनासाठी मध्यरात्री एक वाजेपर्यंत रांगा लावल्या होत्या. त्यानंतर सकाळी परत दर्शनासाठी गर्दी झाली होती. लहान मुलांसह महिलांनी देखील दर्शनासाठी लक्षणीय गर्दी केली होती. यावेळी सर्वांनी पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. त्याचीच ही चित्रमय झलक.