‘किर्लोस्कर वसुंधरा’ महोत्सव आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘किर्लोस्कर वसुंधरा’ महोत्सव आजपासून
‘किर्लोस्कर वसुंधरा’ महोत्सव आजपासून

‘किर्लोस्कर वसुंधरा’ महोत्सव आजपासून

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ ः वसुंधरा क्लबच्या सहयोगाने जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे बुधवारपासून (ता. ९) शनिवारपर्यंत (ता. १२) किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये विविध विषयांवर चर्चासत्रे, लघुचित्रपट, शॉर्ट फिल्म व बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा स्पर्धा, ग्रीन बजार व औषधी वनस्पती प्रदर्शन आणि वसुंधरा सन्मान वितरण असे कार्यक्रम होतील.
‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ असा महोत्सवाचा विषय आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी १० वाजता ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयात महापालिका प्रशासक शेखर सिंह, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे आदींच्या उपस्थितीत होईल. महोत्सवाचा समारोप शनिवारी (ता. १२) सकाळी साडेदहा वाजता भोसरीतील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये होईल. आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके, कला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक मनोज कुमार फुटाणे, लायनचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश कोठावडे उपस्थित राहतील. या वेळी ‘किर्लोस्कर वसुंधरा’ पुरस्कारांचे व विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण होईल. दरम्यान, गुरुवार (ता. १०) व शुक्रवारी (ता. ११) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात ग्रीन बजार व वनौषधी प्रदर्शन होईल.

लघुचित्रपट तारीख, वेळ व ठिकाण
बुधवार, ता. ९ ः दुपारी १२ ते १ ः जेएसपीएम महाविद्यालय, ताथवडे. सायंकाळी ६ ते ७ ः सायन्स पार्क चिंचवड.
गुरुवार, ता. १० ः सकाळी १०.३० ते ११.३० ः आयआयसीएमआर कॉलेज, निगडी. सकाळी ११ ते दुपारी १२ ः पीसीसीओई आकुर्डी.
शुक्रवार, ता. ११ ः सकाळी १० ते ११ ः डीवाय पाटील कॉलेज पिंपरी, दुपारी १२ ते १ ः प्रतिभा कॉलेज चिंचवड, दुपारी ३ ते ४ ः डीवाय पाटील कॉलेड आकुर्डी

चर्चासत्रांचे वेळापत्रक
- बुधवार, ता. ९ ः सकाळी ११.३० ः स्वतःची औषधे - धोका व सुरक्षा ः वक्ते डॉ. आत्माराम पवार, डॉ. श्रीकृष्ण जोशी, रेखा दुबे, प्रशांत हंबर. दुपारी १ ः बायो मिमिक्री लर्निंग फ्रॉम नेचर ः वक्ते अमोल निटवे, डॉ. संजीव लकडे ः स्थळ - जेएसपीएम महाविद्यालय, ताथवडे.
- गुरुवार, ता. १० ः सकाळी ९ ः निरोगीपणासाठी पुनरुज्जीवन ः वक्ते - डॉ. श्रीरंग गोखले, डॉ. राजीव नगरकर, डॉ. अभय कुलकर्णी. स्थळ ः आयआयसीएमआर कॉलेज, निगडी. दुपारी १ ः जलव्यवस्थापन ः वक्ते - प्रवीण लडकत, डॉ. पद्माकर केळकर, शिल्पा मोटेगावकर. दुपारी ३ ः सांडपाणी व्यवस्थापनातील आव्हाने ः वक्ते - संजय कुलकर्णी, नेहा खांडेगावकर, डॉ. संदीप माळी. स्थळ ः पीसीसीओई आकुर्डी.
- शुक्रवार, ता. ११ ः सकाळी ११ ः जल व्यवस्थापन सामग्री ः वक्ते - प्रा. सुधीर आगाशे, गौरव वर्मा, प्रा. अरुण लिमगावकर. दुपारी १ ः नदी स्वच्छतेत स्थापत्य अभियांत्रिकीचे योगदान ः वक्ते - श्रद्धा कमाप्रिया, रामदास तांबे, डॉ. दीपा जोशी. दुपारी ३ ः पर्यावरण व्यवस्थेत युवकांचे योगदान ः वक्ते - डॉ. विश्वास येवले, धनंजय शेडबाळे. स्थळ - डीवाय पाटील आयटी पिंपरी.
---