महापालिका शाळांमध्ये होणार आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका शाळांमध्ये 
होणार आरोग्य तपासणी
महापालिका शाळांमध्ये होणार आरोग्य तपासणी

महापालिका शाळांमध्ये होणार आरोग्य तपासणी

sakal_logo
By

पिंपरी, ता.९ः महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, बौद्धिक पातळीचा अभ्यास करून गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी अनेक वर्षांपासून एकाच शाळेत ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.
शहरात पालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. या शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी लक्ष घातले आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात १० शाळा मॉडर्न करण्याचा पालिकेचा मानस आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत शाळांबाबत सूचना केल्या.
या संदर्भात बोलताना अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या पाच शाळांना भेटी दिल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये एकाच ठिकाणी आठ ते दहा वर्ष काही शिक्षक नोकरी करीत आहेत; मात्र एकाच ठिकाणी जास्त काळ काम केल्याने त्यांची त्या शाळेत मक्तेदारीची परिस्थिती निर्माण होते. अशा शिक्षकांच्या बदल्या करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षक संघटनांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात पालिकेत संघटनांचे प्रतिनिधी येतात. अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी शिक्षक संघटनांसोबत महिन्यातून एकदाच बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय अवलंबिण्यात येतील. खासगी शाळांप्रमाणे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’