संविधान दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक आयोजित करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक आयोजित करावी
संविधान दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक आयोजित करावी

संविधान दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक आयोजित करावी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी अगदी थोडाच अवधी शिल्लक राहिलेला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पक्ष संघटना व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेने संविधान दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक आयोजित करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संपूर्ण संविधान समितीने दोन वर्ष ११ महिने १७ दिवस मोठ्या अथक प्रयत्नाने जगातील सर्वात मोठे लिखित संविधान या देशाला दिले. संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले. ज्यांनी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व शहिदांच्या स्वप्नाला संविधानाच्या माध्यमातून साकार करण्यात आले. महापालिकेच्या वतीने जनसामान्य लोकांपर्यंत हे महान भारतीय संविधान पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संविधान दिन साजरा करण्यात येतो. या संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आपले हक्क, अधिकार, कर्तव्ये भारतीय संविधान याबद्दल प्रबोधन केले जाते व शहरातील नागरिकांसाठी ही एक विचारांची पर्वणी असते. संविधान दिनाच्या प्रबोधन पर्व कार्यक्रमामध्ये शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवतात.