मुख्यमंत्र्यांची ओझर्डे येथे भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांची ओझर्डे येथे भेट
मुख्यमंत्र्यांची ओझर्डे येथे भेट

मुख्यमंत्र्यांची ओझर्डे येथे भेट

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १०ः खंडाळा घाटातील नवीन बोगदा व ओझर्डे येथील ट्रामा केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ओझर्डे येथे भेट दिली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटात सुरु असलेल्या नवीन बोगद्याच्या कामाची पाहणी व ओझर्डे येथील ट्रामा केअर सेंटरला भेट देण्याच्या निमित्ताने मुख्य
मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी ओझर्डे येथील ट्रामा केअर सेंटरला भेट दिली. वेळ कमी असल्याने ओझर्डे येथील ट्रामा केअर सेंटरच्या हॅलीपॅडवर उतरल्यावर त्यांनी
तेथेच ग्रामस्थ व बाळासाहेबांची शिवसेना मावळमधील कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी मावळ मधील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नंतर
त्यांनी ट्रामा केअर सेंटरची पाहणी न करता डॉ. सत्यजित वाढोकर यांच्याकडे सुविधांची विचारपूस केली व माहिती घेतली. दरम्यान यावेळी भारतीय जनता पार्टी किसान
मोर्चाच्या मावळ कार्यकर्त्यांच्या वतीने सेवा रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात आली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच्या गहुंजे ते कुसगाव-लोणावळा दरम्यान रस्त्याला
लगतच्या गावांच्या दळणवळणासाठी द्रुतगती मार्गालगत सेवा रस्ता करावा व या सेवा रस्त्याच्या खडी डांबरीकरणाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी करून निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. हे निवेदन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा कारने ते खंडाळा येथे नवीन बोगद्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेला. या कामाची पाहणी केल्यानंतर पुन्हा ओझर्डे येथील ट्रामा केअर सेंटरच्या हॅलीपॅडवरुन पुढील प्रवासाला गेले.

फोटो-ओझर्डे,
1)सेवा रस्ता मागणीचे निवेदन स्वीकारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
2)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना मावळमधील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करताना.
Smt10Sf1,2