नेहरूनगर न्यायालयाचे काम अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरूनगर न्यायालयाचे काम अंतिम टप्प्यात
नेहरूनगर न्यायालयाचे काम अंतिम टप्प्यात

नेहरूनगर न्यायालयाचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमसमोर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. न्यायालयाचे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले असून, लवकरच या ठिकाणी मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय स्थलांतरित होणार आहे. नेहरूनगर येथे सुरू होणाऱ्या न्यायालयामध्ये एकूण ११ कोर्ट असणार आहेत, याचबरोबर न्यायाधीशांसाठी स्वतंत्र खोलीदेखील या कोर्टात असणार आहे. याचबरोबर अॅडव्होकेट बार असोसिएशनचे कार्यालय, तात्पुरते जेल, पोलिस नियंत्रण कक्ष, मुद्देमाल रूम कँटीन, वेटिंग एरिया, महिलांसाठी हिरकणी कक्ष, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प बनविण्यात आला आहे. यांची रंगरंगोटी, फर्निचर, इलेक्ट्रिकलची कामे पूर्ण झाली आहेत. न्यायालयाच्या आजूबाजूच्या परिसरात डांबरीकरण करण्यात आले आहे. अद्यापही न्यायालयाचे फायर फायटिंग, नेटवर्किंग वेटिंग एरिया शेड, पोलिस नियंत्रण कक्ष यांची कामे पूर्ण होणे बाकी आहे. या न्यायालयामध्ये एकूण १२ कोर्ट सुरू होणार असल्यामुळे या कोर्टात येणाऱ्या नागरिक, पक्षकार, पोलिस, वकिलांची संख्या पाहता या ठिकाणी तीन मजल्यापर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे

‘‘नेहरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. या ठिकाणी एकूण ११ कोर्ट असणार आहेत. महिलांसाठी हिरकणी कक्षदेखील या ठिकाणी असणार आहे. सिव्हिल, फर्निचर, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या फायर फायटिंग व नेटवर्किंगची कामे शिल्लक राहिली आहेत. लवकरच उर्वरित कामेदेखील पूर्ण होतील.’’
-राहुल जिनोकनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका