संत तुकारामनगरमध्ये तीस मिळकती सील मिळकतकर विभागीय कार्यालयाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत तुकारामनगरमध्ये
तीस मिळकती सील
मिळकतकर विभागीय  कार्यालयाची कारवाई
संत तुकारामनगरमध्ये तीस मिळकती सील मिळकतकर विभागीय कार्यालयाची कारवाई

संत तुकारामनगरमध्ये तीस मिळकती सील मिळकतकर विभागीय कार्यालयाची कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः महापालिकेच्या संत तुकारामनगर मिळकतकर विभागीय कार्यालयाने थकबाकी मिळकतधारकांच्या ३० मिळकतींना सील केले आहे. नोटीस दिल्यानंतरही मुदतीमध्ये बिल न भरलेल्या बिगरनिवासी व निवासी मिळकतीवर कारवाई केली आहे. कारवाईतून १४ लाख ६५ हजार रुपये गुरुवारी (ता.१०) वसुल केले आहेत.
संत तुकारामनगर मिळकतकर विभागीय कार्यालयांतर्गत २७ हजार मिळकतधारक आहेत. एक लाखावर थकबाकी असलेल्या मिळकतीची संख्या १५ हजार ७९१ आहेत. त्यातून चार महिन्यांत ३४ कोटी ३२ लाख १२ हजार ८२२ वसूल केले आहेत. त्यापैकी ४७५ मिळकतींना जप्तीचे पत्र पाठविली आहेत. सहायक मंडलाधिकारी (महापालिका भवन विभागीय कार्यालय) संतोष कोराड, जितेंद्र देवकर, मुंकुद वाखारे, अशोक तांडेल यांच्यामार्फत ३५ जणांवर कारवाई केली आहे. ज्या निवासी मिळकती म्हणजे घरे, सदनिका व बंगले बंद केली आहेत. पत्र मिळताच ३० नागरिकांनी कर भरला आहे. अशा एकूण ३१ हजार ९७१ मिळकतधारकांना करसंकलन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस दिल्यानंतरही मुदतीमध्ये बिल न भरलेल्या बिगरनिवासी व निवासी मिळकती सील करण्यात येत आहेत.