पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी देशपांडे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेच्या
अध्यक्षपदी देशपांडे बिनविरोध
पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी देशपांडे बिनविरोध

पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी देशपांडे बिनविरोध

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः पिंपरी- चिंचवड सहकारी बँकेच्या २०२२ ते २७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये बँकेच्या अध्यक्षपदी शिरीष देशपांडे आणि उपाध्यक्षपदी सीए आनंदकुमार गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष शिरीष देशपांडे म्हणाले, ‘‘बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याबरोबर बँकेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व सर्वोत्तम ग्राहक सेवेसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. विश्वस्तांच्या भूमिकेतून संचालक मंडळ काम करेल.’’ बँकेच्या आजी-माजी संचालकांसह मावळते अध्यक्ष श्रीमंत शितोळे, सल्लागार गणेश निमकर, श्रीमंत मालोजीराजे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढ्ढा, संचालक सुव्रत देशपांडे, अंकिता देशपांडे, पुणे कमर्शिअल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, संचालिका मनीषा साळवी, वरिष्ठ अधिकारी वैभव शिंदे, पिंपरी चिंचवड बँकेचे संस्थापक अध्यक्ष हरी पवार, माजी संचालक शिवाजीराव बर्गे, बाबासाहेब साठे, ॲड. प्रदीप निंबाळकर, महाव्यवस्थापक राकेश दर्जे, प्रशासन अधिकारी दिलीप जंगम आदी उपस्थित होते.
---