भंडारा डोंगरावरील शिबिरात १७५ जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा डोंगरावरील शिबिरात
१७५ जणांची तपासणी
भंडारा डोंगरावरील शिबिरात १७५ जणांची तपासणी

भंडारा डोंगरावरील शिबिरात १७५ जणांची तपासणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट व मायमर मेडिकल कॉलेज, भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा डोंगर येथे मोफत आरोग्य तपासणी, औषधे वाटप, डोळे तपासणी, चष्मे वाटप, रक्तदाब तपासणी, महिलांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. वारकरी संप्रदायातील १७५ वारकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
भंडारा डोंगरावर घेतलेल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर, व त्यांची सर्व टीम व भंडारा डोंगर ट्रस्टचे सर्व विश्वस्त, भंडारा डोंगर दशमी समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिरामध्ये भंडारा डोंगर येथील वृद्ध संगोपन केंद्रातील सर्व विणेकरी, सेवेकरी यांचेसह १७५ रुग्णांच्या नेत्र, स्त्रीरोग, रक्तदाब, डायबेटिस अशा विविध तपासण्या करून त्यावर उपचार करण्यात आले. भंडारा डोंगर येथील रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून वारकरी संप्रदायात एक चांगला आदर्श पायंडाच पाडला असल्याचे मत भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी व्यक्त केले.