नोकरी लावण्याच्या आमिषाने तळेगावातील तरुणाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरी लावण्याच्या आमिषाने 
तळेगावातील तरुणाची फसवणूक
नोकरी लावण्याच्या आमिषाने तळेगावातील तरुणाची फसवणूक

नोकरी लावण्याच्या आमिषाने तळेगावातील तरुणाची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला.
या प्रकरणी नागेश तानाजी जगताप (रा. पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप मारुती पांडव (वय ३०, रा. ऐरोली, नवी मुंबई), जगन्नाथन बाळकृष्ण (वय ३७, रा. सेंट्रल रेल्वे कॉलनी, जुई नगर, ठाणे), नितीन महादू वाघ (वय ३८, रा. नवी मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला पनवेल महापालिकेत भरारी पथकात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी डिपॉझिट म्हणून फिर्यादीकडून पाच लाख व इतर फी म्हणून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या नावे पनवेल महापालिकेचे बनावट आयडी कार्ड बनवून दिले. नंतर फिर्यादीला कोणतीही नोकरी न लावता दिलेल्या पैशांपैकी केवळ दीड लाख रुपये फिर्यादीला परत दिले. मात्र, उरलेले पैसे परत न देता फिर्यादीची चार लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ३ डिसेंबर २०२१ पासून अद्यापपर्यंत घडला. तळेगाव दाभाडे पोलिस अधिक तपास करीत आहेत.