महापालिका रुग्णालये रुग्णांसाठी संजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका रुग्णालये
रुग्णांसाठी संजीवनी
महापालिका रुग्णालये रुग्णांसाठी संजीवनी

महापालिका रुग्णालये रुग्णांसाठी संजीवनी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः स्वाइन फ्लू असेल, कोरोना असेल वा अन्य साथीचे आजार; गुंतागुंतीच्या शस्रक्रिया असोत की अन्य गंभीर विकार यावर उपचार करणारे महापालिकेची रुग्णालये व दवाखाने रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत. त्यात आता चार नवीन रुग्णालयांची भर पडली असून त्यांद्वारे ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या वर्षभरात तब्बल पाच लाख २८ हजार १४२ रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (वायसीएम) पिंपरीतील जिजामाता, चिंचवडमधील तालेरा, आकुर्डी, भोसरी, यमुनानगर, सांगवी, थेरगाव असे आठ रुग्णालये होते. त्यात नवीन भोसरी, नवीन जिजामाता व नवीन थेरगाव या रुग्णालयांची भर पडली आहे. त्यामुळे खाटांची संख्या वाढून रुग्णांची सोय झाली आहे. कोरोना काळात वायसीएमसह नवीन भोसरी, नवीन जिजामाता व नवीन थेरगाव रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करण्यात आली. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची तिथे व्यवस्था होती. शिवाय, महापालिकेचे २९ ठिकाणी दवाखाने आहेत. त्यांचाही लाभ रुग्ण व नातेवाइकांना मिळत आहे.

रुग्णालयनिहाय खाटा (बेड)
वायसीएम ः ७६०
नवीन भोसरी ः १००
नवीन जिजामाता ः १२०
नवीन थेरगाव ः २००
कुटे आकुर्डी ः १३०
एकूण ः १३१०

विभागनिहाय रुग्णसंख्या
(ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२)
बाह्यरुग्ण (ओपीडी) ः ४,९८,२५१
आंतररुग्ण (आयपीडी) ः २३,८२४
प्रसूती (सिजरीयन डिलिवरी) ः २०,६५
प्रसूती (नॉर्मल डिलिवरी) ः ४००२
वर्षभरात एकूण रुग्ण ः ५,२८,१४२

‘‘नवीन भोसरी, नवीन जिजामाता, नवीन थेरगाव व आकुर्डीतील प्रभाकर कुटे ही चारही रुग्णालये जून २०२१ पासून कोरोनासह अन्य आजारांवरील उपचारासाठी खुले केले आहेत. या रुग्णालयांत वैद्यकीय व आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. तसेच, रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, किरकोळ व मोठ्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होताना दिसत आहे.’’
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

‘‘माझ्या वडिलचे वय ६८ वर्ष आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. तपासणी केल्यानंतर हर्निया असल्याचे स्पष्ट झाले. ऑपरेशनसाठी खूप खर्च येईल, असे वाटत होते. महापालिका रुग्णालयात ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच ऑपरेशन यशस्वी झाले आहे. दोन दिवसांनी डिस्चार्ज देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खासगी रुग्णालयांत सांगितल्यापेक्षा खर्च कमी आला आहे.’’
- अनिल, रुग्णाचा मुलगा व कामगार