पुसाणे येथे आगीत घरांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुसाणे येथे आगीत घरांचे नुकसान
पुसाणे येथे आगीत घरांचे नुकसान

पुसाणे येथे आगीत घरांचे नुकसान

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १२ ः पुसाणे येथे घरांना लागलेल्या आगीत आठ घरातील सामान जळून मोठे नुकसान झाले असून आगीचे कारण कळले नाही. शुक्रवारी सकाळी पुसाणे येथे काकडा आरती समाप्ती निमित्त आयोजित कीर्तनाला गावातील सर्व नागरिक मंदिरात गेले असताना, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील एका घराला अचानक आग लागली. जवळ कोणीच नसल्याने आग लागल्याचे कोणालाच माहीत न झाल्याने थोड्याच वेळात वाऱ्याने आग वेगाने पसरत आठ घरापर्यंत गेली. आगीचे लोट दिसताच किर्तनातील गेलेल्या सर्व गावकऱ्यांनी घरांकडे धाव घेतली. तरुणांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला व अग्निशामक दलाला माहिती कळवली. आगीची माहिती समजताच पीएमआरडीए व तळेगाव नगरपालिकेचे अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली.
आगीची माहिती मिळण्यास झालेल्या उशीरामुळे गावातील आठ घरातील गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. जवळ कोणीच नसल्याने या आगीचे कारण कळले नाही. या आगीत गावातील शांताराम वाजे, रघुनाथ वाजे, गोपाळ वाजे, विठ्ठल वाजे, गोरख वाजे, गणपत वाजे, विष्णु वाजे, मारुती वाजे यांच्या घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. ही आकस्मिक दुर्घटना असल्याने शासनाने तातडीने या कुटुंबांना मदत करावी, अशी मागणी पुसाणे ग्रामस्थांनी केली आहे.

फोटो ः ४४९६
Smt१२Sf१२,३.