पदपथावरून चाललेल्या तीन आयटी अभियंत्यांना भरधाव मोटारीची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथावरून चाललेल्या तीन आयटी अभियंत्यांना भरधाव मोटारीची धडक
पदपथावरून चाललेल्या तीन आयटी अभियंत्यांना भरधाव मोटारीची धडक

पदपथावरून चाललेल्या तीन आयटी अभियंत्यांना भरधाव मोटारीची धडक

sakal_logo
By

पदपथावरून चाललेल्या तीन आयटी अभियंत्यांना भरधाव मोटारीची धडक

पिंपरी, ता. १२ : पदपथावरून चालत जात असताना भरधाव आलेल्या मोटारीने पदपथावर चढून तीन आयटी अभियंत्यांना धडक दिली. यामध्ये एका तरुणीला अक्षरश: काही अंतर फरफटत नेल्याने अभियंता तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात हिंजवडी-वाकड रोडवर घडला.
अक्षदा प्रदीप मिरजे (वय २३) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तसेच ऋषिकेश श्रीकांत राजे (वय २५, रा. पिंपळे गुरव), अश्विनी राजकुमार स्वामी (वय २३) हे देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी ऋषिकेश यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालक हर्ष मोहन सिंग (वय ३४, रा. माऊंडवर्ड कॉर्सिका, बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तिघेही जखमी हिंजवडीतील आयटी कंपनीत कार्यरत आहेत. दरम्यान, ऋषिकेश हे त्यांची मैत्रीण अक्षदा व अश्विनी असे तिघेजण मॉलमध्ये घरगुती वस्तूंची खरेदी करण्यासाठी गेले होते. रात्री पावणेअकरा वाजता खरेदी करून तिघेजण पदपथावरून चालत घरी निघाले. यावेळी आरोपी हर्ष याने त्याच्या ताब्यातील भरधाव मोटार रस्त्यावरून पदपथावर चढवली व समोरून तिघांना धडक दिली. या धडकेत ऋषिकेश व अश्विनी एका बाजूला पडले. तर, अक्षदा रस्त्यावर पडल्या. मात्र, चालक हर्ष याने मोटार न थांबवता काही अंतरापर्यंत अक्षदा यांना फरफटत नेले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.