सहा महिन्यात दोनदा दुकान फोडणारा आरोपी अखेर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा महिन्यात दोनदा दुकान फोडणारा आरोपी अखेर अटकेत
सहा महिन्यात दोनदा दुकान फोडणारा आरोपी अखेर अटकेत

सहा महिन्यात दोनदा दुकान फोडणारा आरोपी अखेर अटकेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : सहा महिन्यात एकच दुकान दोनदा फोडणाऱ्या आरोपीला अखेर वाकड पोलिसांनी जेरबंद केले. कलीमुल्लाह ऊर्फ सद्दाम हाफीझुल्ला खान (वय २९, रा. साईबाबानगर, कोंढवा, मूळ-उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. कोकणेनगर येथील औंध ते रहाटणी या मार्गावरील प्लायवूडचे दुकान फोडून प्लायवूड व कटर मशिन चोरीला गेल्याचा प्रकार ५ नोव्हेंबरला समोर आला. हेच दुकान जून महिन्यातही फोडले होते व दुकानातील माल चोरीला गेला होता. पाठोपाठ दोन घटना घडल्याने पोलिसांनी कसून तपास सुरु केला. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दरम्यान, आरोपी खान याच्याबाबत पथकाला माहिती मिळाली असता आरोपीला एका फर्निचर दुकानातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता दोन्ही गुन्हे त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही गुन्ह्यातील प्लायवूड, कटर मशिन व इतर माल असा एकूण दोन लाख आठ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. या घटनेचा वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.