महिलेने पादचारी तरुणाचा निगडीत मोबाईल हिसकावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेने पादचारी तरुणाचा 
निगडीत मोबाईल हिसकावला
महिलेने पादचारी तरुणाचा निगडीत मोबाईल हिसकावला

महिलेने पादचारी तरुणाचा निगडीत मोबाईल हिसकावला

sakal_logo
By

पिंपरी ः पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार निगडी, ओटास्कीम येथे घडला. या प्रकरणी नसीम सादिक शेख (रा. चाँदतारा चौक, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पन्नास वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे केटरिंगचे काम झाल्यावर पायी घरी जात होते. दरम्यान, महिला आरोपीने फिर्यादी यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर महिला पसार झाली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चिखलीत दाम्पत्याला बेदम मारहाण
महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मराज संतोष पवार (वय २५, रा. साने चौक, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या पतीसह चिखली रोडने पायी जात होते. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना '' तू मला आवडते, तू माझ्याशी लग्न करणार की नाही, तू तुझ्या पतीला सोडून दे, नाहीतर काय होईल बघ'' अशी धमकी दिली. फिर्यादीचा पाठलाग करून विनयभंग केला. तसेच फिर्यादीसह त्यांच्या पतीला दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दापोडी येथे घडला. या प्रकरणी पीडित सोळा वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार २५ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्याशी वारंवार शरीर संबंध ठेवले. यामध्ये पीडित मुलगी गर्भवती राहिली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

तरुणाची ऑनलाईनद्वारे फसवणूक
तरुणाची ऑनलाईनद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी असीम शशांक गांधी (रा. सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या एसडीएफसी बँक खात्याशी कनेक्ट असलेले क्रेडिट कार्ड हे फिर्यादी यांच्या जवळ असताना त्यांच्या खात्यातून साठ हजार रुपये आरोपीने ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर करून घेतले. या फसवणूक प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोटारीची काच फोडून ऐवज लंपास
मोटारीची काच फोडून ८६ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना किवळे येथे घडली. या प्रकरणी अजिंक्य बळवंत पैठणकर (रा. यमुनानगर, निगडी, सध्या रा. साई हौसिंग सोसायटी, किवळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी सामान आणण्यासाठी मित्राची मोटार आणली होती. या मोटारीची डाव्या बाजूची काच फोडून ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २० हजारांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस
अधिक तपास करीत आहेत.