अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क
सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण
अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण

अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क २०२२ च्या अनुषंगाने राबवीत असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक व सर्वसमावेशक डेटाबेस तयार केला जात आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विविध आस्थापना यांनी या सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणात सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दूरगामी व सकारात्मक परिणाम करणाऱ्या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. या धोरणाला अनुसरून केंद्र शासनाच्या अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क उपक्रमांतर्गत महापालिका विविध उपक्रम आणि योजना राबवीत आहे. ऑनलाइन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण २३ डिसेंबरपर्यंत केले जाईल. त्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त जगताप बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण महत्त्वपूर्ण असून शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विविध आस्थापना यांचा या सर्वेक्षणात सहभाग अपेक्षित आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन शहराला स्पर्धेमध्ये विजयी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.’’

सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण युएलबी कोड ः ८०२८११
सर्वेक्षण फॉर्म भरण्यासाठी लिंक ः https://bit.ly/EOL2022