राष्ट्रीय लोकन्यायालयात ८१७ दावे तडजोडीने निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय लोकन्यायालयात 
८१७ दावे तडजोडीने निकाली
राष्ट्रीय लोकन्यायालयात ८१७ दावे तडजोडीने निकाली

राष्ट्रीय लोकन्यायालयात ८१७ दावे तडजोडीने निकाली

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः राष्ट्रीय लोकन्यायालयात एकूण ८१७ दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. त्या माध्यमातून एकूण दोन कोटी दोन लाख ७९ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पिंपरी-मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी आणि आकुर्डी येथील महापालिका न्यायालयात हे लोकन्यायालय घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिनकर बारणे होते. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. सचिन थोपटे, अ‍ॅड. निखिल बोडके, अ‍ॅड. मंगेश खराबे, अ‍ॅड. ऐश्वर्या शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष अ‍ॅड विजय शिंदे, अ‍ॅड. शुभा पिल्ले, अ‍ॅड. आशा कडूसकर, सर्व सरकारी वकील भामरे, अ‍ॅड. गणेश कनकदंडे, अ‍ॅड. मोरवाडीतील न्यायालयात मानसी उदासी, अ‍ॅड. सुरेखा दफळ, पक्षकार उपस्थित होते.
पिंपरी- चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. मोरवाडी येथील न्यायालयात विविध प्रकारचे १३७ दावे निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ५९ लाख ४८ हजार २६ रुपये महसूल जमा झाला आहे. आकुर्डी येथील न्यायालयात दाखलपूर्व पाणीपट्टी आणि मिळकतकराची एकूण ६८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या माध्यमातून एक कोटी ४३ लाख ३१ हजार २६९ रुपयांचा महसूल जमा झाला. फौजदारी व दिवाणी अशा एकूण २२ प्रकरणांपैकी एकही प्रकरण निकाली निघाले नाही.
पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. वानखेडे, न्यायाधीश आर. एम. गिरी, न्यायाधीश पी. सी. फटाले, न्यायाधीश मोरे यांचा सत्कार पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. लोक न्यायालयासाठी पॅनल न्यायाधीशांच्या अ‍ॅडव्होकेट म्हणून अ‍ॅड. बिनी थॉमस, अ‍ॅड. प्रफुल्लता निगडे, अ‍ॅड. शुभा पिल्ले, अ‍ॅड. आशा भामरे, अ‍ॅड. गणेश कनकदंडे, अ‍ॅड. मानसी उदासी, अ‍ॅड. सुरेखा दफळ, अ‍ॅड. पूजा शिंदे यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांच्या वतीने अ‍ॅड. आतिश लांडगे यांची मेडिटेशन ट्रेनींगसाठी निवड करण्यात आली आहे. पिंपरी न्यायालयातील न्यायाधीशांच्या तसेच असोसिएशनच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला.