सोमाटण्यात कौशल्य विकास प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमाटण्यात कौशल्य विकास प्रशिक्षण
सोमाटण्यात कौशल्य विकास प्रशिक्षण

सोमाटण्यात कौशल्य विकास प्रशिक्षण

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १५ ः एसीजी केअर्स फौंडेशनचे मुंबई व मिटकॉन फोरम यांच्या वतीने आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मावळातील तरुणांनी नोकरीच्या व रोजगाराच्या मागे न लागता छोटे व्यवसाय उभारावेत या उद्देशाने पवनमावळातील तरुणांचे नुकतेच व्यवसाय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पवनमावळातील तरुणांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप मेटकॉन फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर भोसले, एसीजी केरअर्स फौंडेशनचे व्यवस्थापक चंद्रशेखर वाळके व सुनील कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास गणेश खामगळ, सुरेखा माने,केतन पाटील, देविदास आडकर, कोमल गोंजारी, दीपा शिंदे, आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

फोटो-सोमाटणे, व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करताना चंद्रशेखर भोसले, चंद्रशेखर वाळके यांच्यासह प्रशिक्षणार्थी तरुण उपस्थित.
Smt15Sf1.