मौलाना आझाद सांस्कृतिक भवन उभारण्याची ‘भाजप’ची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मौलाना आझाद सांस्कृतिक भवन 
उभारण्याची ‘भाजप’ची मागणी
मौलाना आझाद सांस्कृतिक भवन उभारण्याची ‘भाजप’ची मागणी

मौलाना आझाद सांस्कृतिक भवन उभारण्याची ‘भाजप’ची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने शहरात सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. मोर्चाचे शहराध्यक्ष फारुक इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन उभारण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. तिला प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. हा विषय मुस्लीम समाजाच्या भावनांशी निगडित आहे. मौलाना आझाद यांचे देशाप्रती योगदान लक्षात घेता आपल्यामार्फत सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मार्गी लागावा.’’ अस्लम पठाण, सलीम खान, तौफिक खान, फिरोज शेख, शफीक चौधरी, रेहमतुल्ला चौधरी आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.