आगरी समाज प्रतिष्ठानचा मेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगरी समाज प्रतिष्ठानचा 
मेळावा उत्साहात
आगरी समाज प्रतिष्ठानचा मेळावा उत्साहात

आगरी समाज प्रतिष्ठानचा मेळावा उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : आगरी समाज विकास प्रतिष्ठानचा मेळावा रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सरदार वल्लभ भाई पटेल, बॅडमिंटन हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी आगरी समाज विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेश पाटील होते. यावेळी सुलभा उबाळे, अनिल पाटील, निवृत्त वायुसेना व महाराष्ट्र पोलिस अधिकारी तसेच रायगड भूषण जीवन पाटील, विद्या म्हात्रे, सुरेश कृष्ण, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने आगरी समाज उपस्थित होता. तसेच, महिलांचा सहभाग मोठा होता. मेळाव्यात सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. कोरोना महामारीमध्ये आगरी समाज कुटुंबीयांतील मृत पावलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाजाचा आढावा गणेश पाटील यांनी दिला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मेळावा झाला.

सूत्रसंचालन सुशांत पाटील यांनी केले. विकास धोदरे, सेक्रेटरी राजेश बैकर, रमेश तुंतुणे, दिलदार पाटील, मनोज ठाकूर, जयेंद्र तांडेल, विश्वनाथ तांडेल, सुजित कडू, पुंडलिक ठाकूर, जयंत ठाकूर, सुशांत पाटील या कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.