जनसंवाद सभेत दाखल तक्रारींचा आढावा घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंवाद सभेत दाखल 
तक्रारींचा आढावा घ्या
जनसंवाद सभेत दाखल तक्रारींचा आढावा घ्या

जनसंवाद सभेत दाखल तक्रारींचा आढावा घ्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः शहरातील विकास कामाचा वेग वाढावा आणि नागरी समस्यांचा निपटारा व्हावा, यासाठी प्रशासक शेखर सिंह यांनी संपूर्ण शहराचा प्रभागनिहाय दौरा करावा. जनसंवाद सभांमध्ये आतापर्यंत दाखल समस्यांचा आढावा घेऊन आकडेवारी जाहीर करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश सहसचिव सचिन साठे यांनी केली आहे.
साठे यांच्यासह शहर कार्याध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, प्रदेश युवक कॉंग्रेस माजी सरचिटणीस मयूर जयस्वाल, प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव गौरव चौधरी, मकरध्वज यादव यांनी सिंह यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महापालिकेत मार्चपासून प्रशासकीय राजवट आहे. तेव्हापासून दर सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभांचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये आतापर्यंत नागरिकांनी हजारो समस्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. शिवाय प्रशासकीय काळात अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. प्रशासन सुस्त झाले आहे. शहरात पाणीपुरवठा, रस्त्यांची व सिमेंट रस्त्यांची विकासकामे, वाहतूक समस्या, पदपथ, पथदिवे, सांडपाणी व्यवस्था, उद्यान, शाळा, अतिक्रमणे अशी अनेक कामे प्रलंबित आहेत. त्या कामांचा पाहणी दौरा करावा. जनसंवाद सभांमध्ये स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व शहर विकासाला गती द्यावी.