विद्यार्थी झाले बालसंपादक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी झाले बालसंपादक
विद्यार्थी झाले बालसंपादक

विद्यार्थी झाले बालसंपादक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : वृत्तपत्र म्हणजे काय? ते कसे छापले जाते? बातम्या कुठून मिळतात? मीडियाविषयी आस्था, त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा, याबाबत चेहऱ्यावर कुतूहल... असे वातावरण ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाने मंगळवारी (ता. १५) अनुभवले. निमित्त होते ‘सकाळ एनआयई’ तर्फे बाल दिनानिमित्त आयोजित ‘बाल अतिथी संपादक’ उपक्रमाचे!

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’तर्फे आयोजित उपक्रमात अनेक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी वृत्तपत्रांची नेमकी भूमिका काय, कार्य कसे चालते, वृत्तांकन कसे करावे, संपादन प्रक्रिया कशी असते, वृत्तपत्राची मांडणी, जाहिराती अशा वृत्तपत्रांच्या कार्यशैलीची माहिती जाणून घेतली. संपादकीय, जाहिरात, वितरण यांसह विविध विभागांना भेट देऊन शंकांचे निरसन केले.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्तमानपत्राची कार्यपद्धती काय असते याची माहिती मिळाली. दैनंदिन शालेय वातावरणातून बाहेर पडत विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी ती संकल्पना आपल्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमाची माहिती यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली. प्रकाशित झालेल्या बातम्या, अंकाची मांडणी कशी केली जाते यांची माहिती देण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने विद्यार्थी भारावून गेले. माध्यमांविषयी माहिती जाणून घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले. यावेळी अमृता भोईटे, अलकनंदा कोरपे, सुनीता शिंदे, स्वाती नेवाळे, अनिल राठोड, अविनाश शिरसाट या शिक्षकांसह गायत्री काळे, अविका शिवले, सानिका पाटोळे, रविना खरात, श्रद्धा सोमवंशी, ओमकार चिल्लारे या विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला. ‘सकाळ एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी स्‍वागत व प्रास्ताविक केले.

उपक्रमात सहभागी शाळा
शिक्षण प्रसारक मंडळी मराठी प्राथमिक व माध्यमिक मराठी माध्यम शाळा (निगडी), श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालय (चिंचवड), सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला (चिंचवड), पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय नेहरूनगर पिंपरी, सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी

फोटो - ५०७४