यिनतर्फे ‘आधार दत्तक संस्थेला’ भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिनतर्फे ‘आधार दत्तक संस्थेला’ भेट
यिनतर्फे ‘आधार दत्तक संस्थेला’ भेट

यिनतर्फे ‘आधार दत्तक संस्थेला’ भेट

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः बालदिनानिमित्त सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) विद्यार्थ्यांनी निगडीतील ‘आधार दत्तक संस्थेला’ भेट दिली. छोट्या मुलांसाठी त्यांनी दुध पावडर आणि मोठ्या मुलांना बिस्कीट व चॉकलेट खाऊ म्हणून दिला. या उपक्रमात ‘यिन’चे शहराध्यक्ष चेतन लिम्हन, उपाध्यक्ष रोहिणी पवार, सचिव प्रतिक भागवत, प्रतिक पोळ, सुजल गुप्ता, जयंती गावडे, श्रुती मोहरकर,निखील जोशी, वैभवी देशमुख ,अजमत सय्यद, ओसामा मोमीन, रोहित बाहेती, भार्गव जगताप व यिन सदस्य उपस्थित होते. नियोजन पिंपरी विभागाचे समन्वयक अक्षय बर्गे यांनी केले.

कोट
‘महाविद्यालयीन तरुणाईचा समाजात परिवर्तन घडविण्यासाठी सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुणाला वेळीच चालना मिळाली, तर ते खूप चांगली कामे करू शकतात. त्याची प्रचिती यिन विद्यार्थ्यांनी केलेल्या कामातून दिली आहे.’
- सीमा साळवेकर, कार्यालयीन अधीक्षक, आधार दत्तक संस्था