चिखली बाल संस्कार केंद्रातील मुलांकडून घोरावडेश्वर ट्रेकिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखली बाल संस्कार केंद्रातील
मुलांकडून घोरावडेश्वर ट्रेकिंग
चिखली बाल संस्कार केंद्रातील मुलांकडून घोरावडेश्वर ट्रेकिंग

चिखली बाल संस्कार केंद्रातील मुलांकडून घोरावडेश्वर ट्रेकिंग

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः चिखलीतील नेवाळे वस्तीमधील श्री गजानन बाल संस्कार केंद्रात दर रविवार मोफत संस्कार वर्ग घेतले जातात. त्याउपक्रमांतर्गत घोरावडेश्वर डोंगरावर सर्व मुलांनी ट्रेकिंग केले. चार वर्षाच्या बारा वर्षांखालील मुलांचा त्यात समावेश होता. सर्वजण प्रथमच डोंगर चढले. डोंगर पठारावर पोचल्यानंतर सर्वांनी व्यायाम केला. वेगवेगळे खेळ खेळले. काहींनी कविता म्हटल्या. गड किल्ल्यांची माहिती दिली. मंगेश पाटील यांच्यासह श्रीकृष्ण काशीद, चिरंतन कुलकर्णी, पंकज दलाल, गुरुराज कुंभार, प्रशांत सिंग, विक्रांत मोजे यांनी संयोजन केले.