कार्तिकी वारीसाठी भाविकांचा आळंदीत ओघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिकी वारीसाठी भाविकांचा आळंदीत ओघ
कार्तिकी वारीसाठी भाविकांचा आळंदीत ओघ

कार्तिकी वारीसाठी भाविकांचा आळंदीत ओघ

sakal_logo
By

संजीवन समाधी दिन सोहळा ः हैबतबाबांच्या पायरी पूजनाने आजपासून प्रारंभ

कार्तिकीसाठी भाविकांचा आळंदीत ओघ

पिंपरी, ता. १६ ः श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याच्या निमित्ताने भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत दाखल होऊ लागले आहेत. वारकऱ्यांच्या गर्दीने आळंदी पंचक्रोशी गजबजू लागली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच आळंदी नगरपालिका प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोईसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. आळंदीतील धर्मशाळांमध्ये वारकऱ्यांचा हरिनामाचा गजर सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता जाणकारांकडून होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानची तयारी
- पूजेची वेळ वगळता २४ तास दर्शन
- नदी पलिकडे दर्शनबारीची उभारणी
- भाविकांना खिचडीचे अखंड वाटप
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- परंपरेचे दिंडीकरी, फडकऱ्यांना स्वतंत्र्य दर्शन व्यवस्था

पोलिस यंत्रणा
- गर्दीच्या १० ठिकाणी पोलिस मदत केंद्र
- बंदोबस्तासाठी सुमारे १७०० पोलिस
- प्रदक्षिणा मार्गावर हातगाडी, पथारीवाल्यांना बंदी
- सीसीटीव्हीची ‘नजर’, सर्व मार्गांवर नाकाबंदी
- स्थानिक व वारकरी वाहनांना प्रवेश पास व्यवस्था

आरोग्य यंत्रणा
- वारकऱ्यांसाठी २४ तास आरोग्य सुविधा
- नियमित कर्मचाऱ्यांसह ८० जादा कर्मचारी
- पाच ठिकाणी आरोग्य बूथ
- ग्रामीण रुग्णालयात दोन आपत्ती कक्ष
- आरोग्याच्या दृष्टिने सर्वेक्षण, फवारणी, धुरळणी

पीएमपीएल सेवा
- पुण्यातील स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, कार्पोरेशन
- पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरीसह देहू व हिंजवडीसाठी जादा बस
- काटेवस्ती व डुडुळगाव येथे बसथांब्यांची व्यवस्था
- यात्रा काळात नियमित ९७ व जादा २०३ बस धावणार
- भोसरी-पाबळ, आळंदी-मरकळ मार्ग यात्रा काळात बंद

वारकऱ्यांची रीघ
- संत नामदेव महाराज पालखी सोहळा दाखल
- पंढरपूर संस्थानचा पांडुरंग पादुका सोहळा आळंदीसमीप
- दिंड्यांमधून हजारो वारकरी आळंदी पंचक्रोशीत दाखल
- एसटी, पीएमपी, खासगी वाहनाने वारकरी येताहेत
- दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी हरिनामाचा जागर

कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात तसेच दर्शनबारीत सर्व व्यवस्था देवस्थानने केली आहे. त्यांना पिण्याचे पाणी, तसेच खिचडी वाटप करण्यात येणार आहे. दर्शनबारीतील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करता येईल का? याबाबत नियोजन सुरू आहे. भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सोय उपलब्ध आहे.
- ॲड. योगेश ढगे-पाटील, प्रमुख विश्वस्त, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जात आहे. तपासणी व लसीकरणाची सोय ग्रामीण रुग्णालयात केली आहे. आरोग्य विभागाची जादा कुमक आळंदीत दाखल होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, चाकण चौक, वडगाव चौक, दर्शनबारी, इंद्रायणी घाट आजी ठिकाणी आरोग्य तपासणी बूथ व रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे.
- डॉ. ऊर्मिला शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, आळंदी ग्रामीण रुग्णालय

वारीसाठी जादा पोलिस बंदोबस्त आहे. शहरात येणाऱ्या वाहनांचा त्रास लक्षात घेऊन यंदा स्थानिक नागरिकांसाठी, तसेच वारकरी दिंड्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पास व्यवस्था केली आहे. ते पास
आळंदी पोलिस स्टेशनला अर्ज केल्यानंतर दिले जातात. त्यामुळे शहरातील होणारी अन्य वाहनांवर निर्बंध ठेवता येईल. पोलिस बंदोबस्त सुसज्ज आहे.
- सुनील गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी

मंदिरातील आजचे कार्यक्रम
- पहाटे ३ ते ५ ः पवमान अभिषेक व दुधारती
- सकाळी ५ ते ११.२० भाविकांच्या महापूजा
- सकाळी ७ ते ९ ः गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरीची पूजा
- दुपारी १२.३० ते १ ः महानैवेद्य
- सायंकाळी ६.३० ते ८ ः योगीराज ठाकूर यांच्यातर्फे कीर्तन
- रात्री ९ ते १२ ः बाबासाहेब आजरेकर यांच्यातर्फे कीर्तन
- रात्री ९ ते १२ ः माउलींची पालखी प्रदक्षिणा
- रात्री १२ ते १२.३० ः धुपारती
- रात्री १० ते १२ ः हैबतबाबांच्या पायरीपुढे वासकर यांच्यातर्फे जागर
- रात्री १२ ते २ ः हैबताबाबांच्या पायरीपुढे मारुतीबुवा कराडकर यांच्यातर्फे जागर
- रात्री २ ते ४ ः हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे जागर
--------------------
५३७९
५३७६
------------------
शटरस्टॉक फोटो नंबर
1031926732
1719321436
1719322810
1847332312