दिव्यांगांचे ‘स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांचे ‘स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय’
दिव्यांगांचे ‘स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय’

दिव्यांगांचे ‘स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय’

sakal_logo
By

पिंपरी, ता.१६ः राज्यातील दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बच्चू कडू यांच्या लढ्याला यश आल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हलगीच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत दिव्यांगांनी एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला. राज्यातील दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार क्रांती आंदोलनाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यासाठी गेली २५ वर्षे लढा दिला. विधानसभेच्या सभागृहात याबाबत आवाज उठवून वेळोवेळी सरकारांची कान उघाडणी केली. मात्र, त्यावेळच्या सरकारांनी हा निर्णय घेण्याबाबत सकारात्मकता दाखविली नव्हती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील दिव्यांगांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, उपशहरप्रमुख राजेंद्र वाकचौरे, महिला शहरप्रमुख संगिता जोशी, ज्ञानदेव नारखेडे, रामचंद्र तांबे, राजू विटकर, विद्या तांदळे, राजाराम पाटील, मेहुल भन्साळी, सुनीता बिराजदार, पिंपळे गुरव मूकबधिर सोसायटीचे सहसचिव गजानन जगताप,आदींनी सहभाग घेतला. महापालिकेतील दिव्यांग कक्षाचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी ही जल्लोषात सहभाग घेतला. राज्यात दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त करून दिव्यांग प्रतिनिधींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.