वृक्षतोडीविरोधात सह्यांची निगडीमध्ये मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षतोडीविरोधात सह्यांची 
निगडीमध्ये मोहीम
वृक्षतोडीविरोधात सह्यांची निगडीमध्ये मोहीम

वृक्षतोडीविरोधात सह्यांची निगडीमध्ये मोहीम

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : प्राधिकरण, निगडीतील गणेश तलावाजवळ सध्या बेसुमार झाडांची कत्तल सुरू आहे. दिवसा ठेकेदाराने झाडांवर बुलडोझर फिरविला आहे. हा तलाव परिसर उजाड होण्यास वेळ लागणार नाही. या परिसरातील झाडांमुळे या परिसराचे वैभव टिकून आहे. प्राधिकरणामध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे अशाच पद्धतीने काढली गेली आहेत. तसेच, प्राधिकरणातील टिळक रोडजवळील झाडे देखील अशाच पद्धतीने काढली गेली होती. या झाडांची कत्तल रोखली जावी, याकरिता १०३ नागरिकांनी एकत्रित येऊन सह्यांची मोहीम राबविली आहे. याबाबत महापालिका आयुक्त यांना निगडीतील हेडगेवार भवन या भागातील रहिवासी चंद्रकांत कोठारी यांनी निवेदन दिले आहे.