महात्मा फुलेनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा फुलेनगरमध्ये 
दुर्गंधीयुक्त पाणी
महात्मा फुलेनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी

महात्मा फुलेनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : पिंपरीतील महात्मा फुलेनगरमध्ये पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत असून अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा होत नाही. शिवाय, या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी तसेच, तुंबलेले सांडपाणी दुरुस्त करण्यात यावेत. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार नगरसेवकांना देखील तक्रारी केलेल्या आहेत. धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे सुरेश म्हेत्रे यांनी देखील याबाबत पाठपुरावा केला आहे. रहिवासी प्रतिभा वानखेडे यांनी पाच ते सहा महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही. वारंवार सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले जात असून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगितले.