इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये शेती, घरांचा समावेश नको खासदार बारणे यांची पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये
शेती, घरांचा समावेश नको
खासदार बारणे यांची पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये शेती, घरांचा समावेश नको खासदार बारणे यांची पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी

इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये शेती, घरांचा समावेश नको खासदार बारणे यांची पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हे या भागातील मोठे क्षेत्र पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील (इको-सेन्सिटिव्ह) झोन करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. असा झोन करण्यास विरोध नाही. परंतु; घरे, शेतीक्षेत्र, धरण परिसरातील गावांचा त्यात समाविष्ट करू नये, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वन व पर्यावरणमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील (इको-सेन्सिटिव्ह) झोन वाढविण्याबाबत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ‘इको-सेन्सिटिव्ह’बाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली.
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हे या भागातील ''इको-सेन्सेटिव्ह क्षेत्रात वाढ करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. असा झोन करण्यास विरोध नाही. पण, डोंगर माथ्यावर असलेल्या झाडीवर वनजीवन सुरक्षा कायद्याअंतर्गत करण्यास काहीच हरकत नाही. परंतु, ज्या भागात शेती केली जाते. नागरिकांची घरे आहेत. धरण क्षेत्र व त्याला लागून असलेल्या जमिनीच्या भागात ''इको-सेन्सेटिव्ह झोन केला. तर, त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.
मुनगंटीवार म्हणाले, की ‘इको-सेन्सेटिव्ह झोन निश्चित करताना सकारात्मक निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील ज्या लोकप्रतिनिधींचा भाग यामध्ये येत आहे. त्यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक घेतली जाईल. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करुनच ''इको-सेन्सेटिव्ह झोन वाढविण्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल.

‘‘केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ‘इको-सेन्सिटिव्ह’बाबत राज्य सरकारकडून अहवाल मागविला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत, खालापूरमधील काही भाग पूर्वीच ‘इको-सेन्सेटिव्ह झोन आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांना घरे बांधता येत नाही. कोणताही विकास करता येत नाही. ‘इको-सेन्सेटिव्ह झोन शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत.’’
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ.