प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांबा द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रगती एक्स्प्रेसला 
चिंचवड येथे थांबा द्या
प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांबा द्या

प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांबा द्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : शहराची लोकसंख्या ३५ लाखांहून अधिक आहे. वेगाने प्रगत झालेले व जास्त लोकसंख्या असलेले शहर म्हणजे पिंपरी-चिंचवड आहे. या शहरातून हजारो व्यापारी, व्यावसायिक, शासकीय-निमशासकीय कर्मचारी व खासगी कंपन्यांचे कामगार यांना कामानिमित्त मुंबईला रोज ये-जा करावी लागते. सकाळच्या वेळेत ६.३५ नंतर मुंबईला जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नाही. प्रगती एक्सप्रेसला जाता-येता चिंचवड स्टेशन येथे थांबा द्यावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी मध्य रेल्वेचे मुख्य यात्री परिवहन प्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी व चिंचवड रेल्वे स्थानकातून मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजार ते बाराशे आहे. रेल्वे प्रशासनाने गेल्या तीन वर्षात पाच वेळा पिंपरी व चिंचवड रेल्वे स्थानकावरील सकाळच्या वेळेतील गर्दीचे व उपलब्ध गाड्यांचे सर्वेक्षण केले आहे. या स्टेशनवरून मुंबईला जाण्यासाठी सकाळी ६.३५ नंतर थेट साडे नऊ तासांनी म्हणजे संध्याकाळी ४.१५ वाजता कोयना एक्स्प्रेस आहे. यापूर्वी सह्याद्री एक्स्प्रेस होती. आता ती बंद करण्यात आलेली आहे. प्रगती एक्सप्रेसला सकाळच्या वेळेत कनेक्टिंग लोकल नाही. प्रगती एक्सप्रेसला येता-जाता चिंचवड येथे थांबा दिल्यास दैनंदिन व इतर प्रवाशांना १००% सोयीचे होईल. तसेच प्रवाशांच्या संख्येतही वाढ होईल. सध्या मुंबईला जाण्यासाठी प्रवासी चिंचवड स्टेशनला लागून असलेल्या खासगी वाहनातून अधिक पैसे खर्च करून जात आहेत.