काम संथगतीने ः गेल्या तीन वर्षात केवळ पंधरा टक्के काम इंदिरा गांधी पूल दुरूस्तीच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काम संथगतीने  ः गेल्या तीन वर्षात केवळ पंधरा टक्के काम 
इंदिरा गांधी पूल दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
काम संथगतीने ः गेल्या तीन वर्षात केवळ पंधरा टक्के काम इंदिरा गांधी पूल दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

काम संथगतीने ः गेल्या तीन वर्षात केवळ पंधरा टक्के काम इंदिरा गांधी पूल दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ ः महापालिकेच्या ऑडिट अहवालानुसार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम बीआरटीएस विभागाने तीन वर्षापूर्वी हाती घेतले आहे. परंतु अनेक अडथळ्यांच्या शर्यतीमुळे अद्याप हा पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू केले असून, ९० दिवसांसाठी हा रस्ता बंद केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाची दुरुस्ती संथगतीने सुरू आहे. गेल्या तीन वर्षात १५ टक्के इतके काम झाले आहे. हा उड्डाणपूल धोकादायक झाल्‍याने त्यांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. ३ मे २०१८ मध्ये अहवाल तयार केला आहे. दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतल्यानंतर त्यावर सी. व्ही. कांड यांची सल्लागारपदी नियुक्ती केली. दुरुस्तीचे काम हरक्युलेस स्ट्रक्चरल सिस्टिम कंपनीला दिले. मात्र लॉकडाउनमुळे मनुष्यबळाअभावी पुलाचे काम रखडले.

पुन्हा मुदतवाढ
कोरोना काळात काम जमत नसल्याने सी. व्ही. कांड यांच्याशी महापालिकेने केलेला करार रद्द केला आहे. त्‍यांच्या जागी फेब्रुवारी २०२२ मध्ये युनिसन कन्सलटंटची नियुक्ती केली आहे. उर्वरित कामे नवीन एजन्सी पाहत आहे. त्यांना ३१ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यांना दुसऱ्यांदा मुदत वाढवून दिली आहे.


अशी झाली पुलाची ‘कोंडी’
१) पिंपरी वाहतूक विभागाकडून परवानगी मिळत नसल्याचा महापालिकेचा आरोप
२) यापूर्वीही परवानगी मिळाली नसल्याने सहा महिने वाया
३) अनेकदा पत्र व्‍यवहार करावा लागतो. त्यात वेळेचा अपव्यय
४) या पुलावरून ९० दिवसांसाठी लिंक मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे.
५) रॅम्‍प वन (शगुन चौक ते भाटनगर) निम्मे काम पूर्ण
६) रॅम्प २ (रेल्वे उड्डाणपुलवरील भाग)अद्याप झालेला नाही.
७) रॅम्‍प ३ चे काम (मोरवाडी) पूर्ण झाला आहे.
८) रॅम्‍प चारमध्ये गोकुळ हॉटेल ते पिंपरी पुलापर्यंतचे काम झाले आहे.
९) सध्या प्रत्येक कॉलमला आवरण देण्याचे काम सुरू.

धोकादायक पूल
१) अत्यंत वर्दळीच्या या पुलावर काही दिवसापूर्वी कठडा तुटला.
२) दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू
३) सिमेंट, विटांचे तुकडे खाली पडले.
४) कठडा तुटलेल्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली. मात्र, कोणीही दखल घेतली नाही.
५) पुन्हा अपघाताची शक्यता

आकडे बोलतात ः
बांधकाम ः ३६ वर्ष जुने
कामाची निविदा ः ८ कोटी ११ लाख
वर्कआॅर्डर ः २८ फेब्रुवारी २०२२
मुदतवाढ ः -३१ मे २०२३ पर्यंत
काम बंद ः कोरोनाकाळातील २ वर्ष

कोट
‘‘रॅम्‍प वन उर्वरित भागाच्या कामासाठी वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. काम प्रगतिपथावर आहे. नंतर पुलाखालील बाजूचे काम करण्यात येईल.’’
-प्रेरणा सिनकर, मुख्य कार्यकारी अभियंता बीआरटीएस विभाग

फोटो ः 04795, 0479४, 0479६, 04797