उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या उद्योजक मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या उद्योजक मेळावा
उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या उद्योजक मेळावा

उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या उद्योजक मेळावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.१९) उद्योजक मेळावा होणार आहे. दुपारी ४ वाजता मोशीतील स्पाईन रोडवरील संतनगर चौकातील पर्ल बेन्क्वीट येथे हा मेळावा होईल. महापालिका कार्यक्षेत्रातील औद्योगिक परिसरात व चाकण औद्योगिक परिसरात उद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावर या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर व जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सचिव जयंत कड यांनी दिली.