मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना
मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना

मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः महापालिका सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण मिळावे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी स्थापन केलेल्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना केली. समितीच्या अध्यक्षस्थानी सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांची नियुक्ती केली आहे. सदस्यांमध्ये सहायक आयुक्त सुषमा शिंदे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे, लघुलेखक सुनिता पळसकर, उपलेखापाल शुभांगी चव्हाण, जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष कविता खराडे यांचा समावेश आहे. प्रशासन विभागप्रमुख व आरोग्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध सदस्य असून कामगार कल्याण अधिकारी सदस्य सचिव आहेत.
--