योग शिक्षिकांचा दिल्लीत राष्ट्रीय योगवीर सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योग शिक्षिकांचा दिल्लीत राष्ट्रीय योगवीर सन्मान
योग शिक्षिकांचा दिल्लीत राष्ट्रीय योगवीर सन्मान

योग शिक्षिकांचा दिल्लीत राष्ट्रीय योगवीर सन्मान

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : योग एक मुख्य व स्वतंत्र विषय महाअभियान अंतर्गत दिल्ली येथील लाजपतभवन ऑडिटोरियम येथे अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाद्वारे राष्ट्रीय योगवीर सम्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कोरोना काळात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार, प्राणायाम ७२ लाख व सामूहिक योगाभ्यास तसेच हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योगाभ्यासात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुण्यातील ज्येष्ठ योग शिक्षिका नूतन लोलप : कोथरूड, ज्योती देशपांडे : खराडी, रूपाली वाडकर : चिंचवड यांचा सत्कार केला. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे अध्यक्ष मंगेश त्रिवेदी, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्र, राष्ट्रीय योग संस्था संचालक डॉ. ईश्वर बसवरेड्डीया यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय योग वीर सन्मानपत्र देण्यात आले.