जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जीजी, सिटी प्राइड, इंदिरा, अक्षरा विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत 
जीजी, सिटी प्राइड, इंदिरा, अक्षरा विजेते
जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जीजी, सिटी प्राइड, इंदिरा, अक्षरा विजेते

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जीजी, सिटी प्राइड, इंदिरा, अक्षरा विजेते

sakal_logo
By

टेबल टेनिस स्पर्धेत
इंटरनॅशनल स्कूल विजेते

पिंपरी, ता. १८ ः महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात पिंपरीतील जी. जी. इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावले. ताथवडेतील इंदिरा नॅशनल स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात निगडीतील सिटी प्राइड ज्युनिअर कॉलेजने विजेतेपद पटकावले. ताथवडेतील इंदिरा नॅशनल स्कूलने (द्वितीय) आणि पिंपरीतील जी. जी. इंटरनॅशनल स्कूलने (तृतीय) क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात ताथवडेतील इंदिरा नॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावले. वाकड येथील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलने (द्वितीय) व युरो स्कूलने (तृतीय) क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अक्षरा इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावले. इंदिरा इंटरनॅशनल स्कूल ताथवडे (द्वितीय) व एस. बी. पाटील पब्लिक स्कूल रावेतने (तृतीय) क्रमांक पटकावला. निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर स्पर्धा झाली. क्रीडा पर्यवेक्षक श्रीरंगराव कारंडे उपस्थित होते. पंचप्रमुख चंदर थावानी, संदीप शर्मा यांनी काम पाहिले.