कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारसाई धरण परिसरात 
पर्यटकांची गर्दी
कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १८ ः कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. धरण परिसरातील शुद्ध व थंडीचे वातावरण, मावळी जेवण, तांबडा रस्सा, बोटींग-हॉर्स रायडींगची सोय आदी सुविधा धरण परिसरात मिळत
असल्याने या सुविधांचा अनुभव घेण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, आयटी पार्क येथील तरुण पर्यटक गेल्या एक दशकापासून पर्यटनासाठी येथे येतात. त्यातच पावसाने उघडीप दिली असून गेल्या तीन आठवड्यापासून थंडीची सुरुवात झाली आहे. सध्या कासारसाई धरणालगतच्या परिसरात थंडीचे वातावरण निर्माण झाल्याने येथील बोचऱ्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी सकाळपासूनच पर्यटकांनी येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. येत्या शनिवार, रविवारी जोडून सुट्टी आल्याने या दोन दिवसात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अनेक पर्यटकांनी सकाळीच कासारसाई धरण परिसरात हजेरी लावली.

Smt१८Sf२.