बीएलओ करेना वाटप, मतदान कार्ड शाळेत पडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएलओ करेना वाटप, मतदान कार्ड शाळेत पडून
बीएलओ करेना वाटप, मतदान कार्ड शाळेत पडून

बीएलओ करेना वाटप, मतदान कार्ड शाळेत पडून

sakal_logo
By

पिंपरी, ता.१८ः मतदारांना वितरित करण्यासाठी आलेली शेकडो मतदान कार्ड चिखलीतील शरदनगरच्या के. जी. चावला शाळेत गेली २ वर्षापासून धूळखात पडून असल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील मतदारांना वितरित करण्यासाठी दोन वर्षभरापूर्वी निवडणूक विभागाकडून मतदान कार्ड पाठवण्यात आली होती. परंतु, हे कार्ड आल्याची कल्पना बीएलओ असलेल्या शिक्षकांनी नागरीकांना दिलीच नाही. त्यामुळे मतदारांपर्यंत कार्ड आल्याची माहितीच नागरिकांपर्यंत पोचली नसल्याचे समजते. पूर्वी बीएलओ (बूथ लेवल अधिकारी) शिक्षक नागरीकांना घरपोच कार्ड देत. पण आता घरोघरी कोणीच फिरकले नसल्याने कार्ड वितरित झाले नाही. त्यामुळे के. जी. कार्ड शाळेत तशीच पडून राहिली आहेत. मतदान कार्ड शाळेतून मिळत नसल्याने त्यातील काही कुजली आहेत. काही रंगहीन झाले आहेत. शाळेत कार्डाची पोती भरून ठेवली आहेत. आता ती वितरित केली नाही तर, कचराकुंडीत फेकण्याच्या मार्गावर गेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक घरकुल, शरद नगर, नेवाळवेस्ती या भागातील नागरिकांचे कार्ड आहेत. ज्यांना कार्डाबद्दल माहिती आहे, अशांना बीएलओकडून यादी तयार करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. वास्तविक पाहता शिक्षकांनी मतदारांना घरपोच मतदार कार्ड देणे आवश्‍यक आहे. याबाबत वारंवार नागरीकांनी निवडणूक विभागाकडेदेखील तसा पत्रव्यवहार केला होता. परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही.
याबाबत स्थानिक नागरिक अशोक मगर म्हणाले, ‘‘निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावून त्या- त्या परिसरातील नागरीकांना कार्ड वाटप केले पाहिजेत.’’