सोमाटणेत रस्ता दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमाटणेत रस्ता दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण
सोमाटणेत रस्ता दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण

सोमाटणेत रस्ता दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १९ ः मळवंडी शिवणे, कडधे रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरु केल्याने या रस्त्यावर होणारे दुचाकीस्वारांचे अपघात टळले आहेत. यावर्षी पडलेल्या जोरदार पावसाने मळवंडी, शिवणे, कडधे रस्त्यावरील खडी डांबर उखडल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. या रस्त्याने वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत होती, तर रात्रीच्यावेळी दुचाकी घसरून पडण्याचे अनेक प्रकार येथे घडले होते. पवनमावळातील विविध गावातील नागरिकांना सोमाटणे येथे येण्यासाठी ही रस्ता जवळचा असल्याने याचा वापर शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकरी, दुधविक्रेते अधिक करत होते. त्यामुळे या रस्त्यावर सतत दुचाकी स्वारांची अधिक वर्दळ होती. दुचाकीस्वारांचे होणारे किरकोळ अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी शिवणे, मळवंडी ग्रामस्थांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले व वेगाने पूर्ण केले.
Smt19Sf1.