‘विद्यार्थी, शिक्षकांना प्रोत्साहन देणारे धोरण हवे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विद्यार्थी, शिक्षकांना 
प्रोत्साहन देणारे धोरण हवे’
‘विद्यार्थी, शिक्षकांना प्रोत्साहन देणारे धोरण हवे’

‘विद्यार्थी, शिक्षकांना प्रोत्साहन देणारे धोरण हवे’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : शहरातून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या २००१ च्या क्रीडा धोरणातील विविध शिफारशीचा अवलंब महापालिका प्रशासनाने केलेला नाही. पायाभूत सुविधांसह भारतीय मैदानी व ऑलिंपिक दर्जाच्या खेळासाठी शहरातील खासगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देणारे महापालिकेचे क्रीडा धोरण असले पाहिजे, अशी मागणी आप क्रीडा आघाडी अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील खेळाडूंना मनपाच्या हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा द्या. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मोफत आरोग्य विमा काढा. पदकविजेते खेळाडूंना दरमहा पेन्शन सुविधा चालू करा. नोकर भरतीमध्ये स्थानिक खेळाडूंना प्रथम प्राधान्य द्या. खेळाडूंचे आरक्षण ५% वरून १०% करा. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व पदक विजेत्यांना शिष्यवृत्तीमध्ये एक लाखापर्यंत तरतूद करा.
क्रीडा प्रबोधिनीमध्ये गरीब कुटुंबातील खेळाडूसाठी शिक्षण सेमी इंग्लिशमधून असावे. शाळेमध्ये मिळणाऱ्या सुविधादेखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिळाव्यात. दैनंदिन सरावासाठी वापरात येणाऱ्या साहित्य खरेदीमध्ये अनुदान किंवा मोफत साहित्य उपलब्ध करावे. खेळाडू दत्तक योजना पुन्हा चालू करावी. अण्णासाहेब मगर स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करावे. त्यामध्ये सर्व खेळांची मैदाने तयार करावी. मैदान, जलतरण व इतर क्रीडा सुविधा ज्या बंद आहेत त्या चालू कराव्यात. त्याठिकाणी प्रशिक्षक नेमावेत. आपच्या व्हीजन डाक्युमेंटमध्ये क्रीडा धोरण स्पष्ट करत आहोत, असे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.