पोलिसांचा हवा वचक ः आरोपींकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तडीपार आरोपींचा सुळसुळाट (मेन शीर्षक) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा हवा वचक ः आरोपींकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न  
तडीपार आरोपींचा सुळसुळाट (मेन शीर्षक)
पोलिसांचा हवा वचक ः आरोपींकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तडीपार आरोपींचा सुळसुळाट (मेन शीर्षक)

पोलिसांचा हवा वचक ः आरोपींकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तडीपार आरोपींचा सुळसुळाट (मेन शीर्षक)

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला तडीपार केल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ॲप तयार केले. पोलिसांकडूनही लक्ष ठेवले जाते, तरीही हे आरोपी आयुक्तालयाच्या हद्दीत येतात. काही आरोपी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. अशा आरोपींवर कडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
पोलिसांनी संबंधित आरोपीला हद्दीतून तडीपार केल्यानंतर त्याला निश्चित करून दिलेल्या भौगोलिक हद्दीच्या बाहेर ठराविक कालावधीसाठी वास्तव्य करणे बंधनकारक आहे. दरम्यान, तरीही काही आरोपी हद्दीत येतात. त्यांच्याकडून पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असते. यापूर्वी आयुक्तालयाच्या हद्दीतही असे प्रकार घडले आहेत.
-------------------
या महिन्यातील घटना
३ नोव्हेंबर
शाहिद साजिद शेख (रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) याला दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असताना, तो हद्दीत आला. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाला दमदाटी, धक्काबुक्की करून अंगावर धावून गेला.
----------------
१५ नोव्हेंबर
भोसरी येथे तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या चनाप्पा परशुराम सुतार (वय २४, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) या तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली. ५ ऑगस्ट २०२१ ला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही तो हद्दीत आला.
---------------------------
१९ नोव्हेंबर
पिंपरी येथील गौतम उर्फ दाद्या दीपक कदम (वय २३, रा. रिव्हर रोड, बौध्दनगर, पिंपरी) याला तडीपार केलेला असतानाही तो हद्दीत आला. दुकानात शिरून कोयत्याने वार करीत गल्ल्यातील रोकड लुटली. तरुणासह त्याच्या आईला शिवीगाळ, मारहाण केली.
------------------------------
तडीपार आरोपी पोलिस ठाणे निहाय
पोलिस ठाणे आरोपी
पिंपरी -३०
चिंचवड - १७
निगडी - ४३
भोसरी - १८
एमआयडीसी भोसरी - १९
दिघी - २
आळंदी - ११
चाकण - ९
म्हाळुंगे - ७
वाकड - २४
हिंजवडी -८
सांगवी -७
देहूरोड - १६
तळेगाव -३
शिरगाव -१
चिखली -२
रावेत - ०
तळेगाव एमआयडीसी-०
-----------------------
एकूण - २१७
----------------

तडीपार गुन्हेगार (ग्राफ)
वर्ष आरोपी
२०१८ - २७
२०१९ - ११२
२०२० - ९३
२०२१ - १६८
२०२२ - १०८
-------------------

* अशी होते कारवाई

१) खून, खुनाचा प्रयत्न, दंगा, दहशत माजविणे आदी गंभीर गुन्हे वारंवार करणे
२) संबंधित गुन्हेगारांकडून होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी.
३) जिल्हा, तालुका अथवा ठराविक भागातून ठराविक कालावधीसाठी केले जाते हद्दपार.
४) दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन तडीपारीची निर्णय.
------------------------------------

* वावर वाढण्याची कारणे
१) तडीपार गुन्हेगारांची स्थानिक पोलिसांकडून वेळोवेळी चाचपणी आवश्यक.
२) दहशत कायम ठेवण्यासाठी, आर्थिक चणचण भासल्यास गुन्हेगार पुन्हा हद्दीत.
३) कुटुंबीयांना भेटण्यासह इतर कारणांसाठी हद्दीत ये-जा.
४) ॲपचा हवा तसा वापर होत नसल्याने.
५) मोबाईल बंद पडला, नेटवर्क नाही अशी कारणे देत पोलिसांना गुंगारा
---------------------

* ॲपची माहिती
- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला हद्दीतून तडीपार केल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या ॲपचा वापर.
-ॲपवरून मोबाईलद्वारे आरोपींनी रोज पोलिसांच्या संपर्कात राहण्यासह आरोपींनी सेल्फीही पाठवणे आवश्यक.
-ॲपद्वारे पोलिसांना आरोपीचे समजते लोकेशन.
- पोलिसांकडून पाठपुरावा आवश्यक .

-------------