अलंकापुरीत उसळला वैष्णवांचा महासागर (फोटो फिचर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलंकापुरीत उसळला वैष्णवांचा महासागर (फोटो फिचर)
अलंकापुरीत उसळला वैष्णवांचा महासागर (फोटो फिचर)

अलंकापुरीत उसळला वैष्णवांचा महासागर (फोटो फिचर)

sakal_logo
By

अलंकापुरीत उसळला वैष्णवांचा महासागर
आळंदी : यंदा कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले होते. रविवारी (ता.२०) इंद्रायणीचा काठ गर्दीने फुलून गेला होता. सकाळीच इंद्रायणी तीरावर बोचऱ्या थंडीत वारकऱ्यांनी तीर्थस्नान केले. अनेक दिंड्या तीरावर आल्यावर त्यातील वारकरी महिला व पुरुष फुगड्या तसेच विविध खेळ खेळताना दिसले. इंद्रायणीकाठी टाळ मृदूंगाच्या निनादात तसेच ''ज्ञानोबा माऊली तुकाराम''च्या जयघोषात परिसर भारावून गेला होता. गर्दीत भगव्या पताका सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. लहान मुले कपाळी गंध व टिळा लावून फिरताना दिसत होते. अलंकापुरी आनंदी व भक्तिमय वातावरणात चिंब झाली होती. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)