बाळाजी आवजी यांची पुण्यतिथी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळाजी आवजी यांची
पुण्यतिथी साजरी
बाळाजी आवजी यांची पुण्यतिथी साजरी

बाळाजी आवजी यांची पुण्यतिथी साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः स्वराज्याचे पहिले चिटणीस बाळाजी आवजी यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.
खोपोली-पाली रस्त्यावरील पेडली या गावाजवळील औंढ्याचा माळ येथे छत्रपती संभाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी स्थापन केली. तेथे कायमस्वरूपी दिवाबत्तीची सोयही करून ठेवली. तेव्हापासून बाळाजी आवजी चिटणीस यांचे पुत्र खंडोबल्लाळ चिटणीस यांचे कऱ्हाड तालुक्यातील मौजे वडगाव येथील वंशज एकत्र येऊन ही पुण्यतिथी साजरी करतात. यावेळी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित राहून स्मरण करतात. वारस व औंढे गावचे ग्रामस्थ तसेच पेडली वाघोशी येथील मुख्याध्यापक यांनी एकत्र येऊन या समाधीवर शेड व सभोवती जाळीचे कुंपण उभारले आहे.
वडगावकर चिटणीस कुटुंबीयदेखील येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी बक्षीसे देण्याचा उपक्रम राबवत आहेत.