स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची बालदिंडी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची बालदिंडी उत्साहात
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची बालदिंडी उत्साहात

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची बालदिंडी उत्साहात

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २१ : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी (ता. २०) विद्यार्थ्यांनी दिंडीसोहळा उत्साहात साजरा केला. दिंडी सोहळ्यामुळे समाजात बंधुभाव रुजवण्याचे प्रबोधनकार्य होते. विद्यार्थीदशेत असे संस्कार सामाजिक एकतेसाठी मोलाचे असल्याचे शिक्षिका विजयमाला गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गवळणी, अभंग गायन तसेच बालवारकऱ्यांनी रिंगण करून खेळलेल्या फुगड्यांमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ जयघोष करत पारंपरिक वेशभूषेतील बालचमुच्या डोक्यावरील तुळशी वृंदावन, हाती घेतलेल्या भगव्या पताकांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात आली, तेथे दिंडीचा समारोप झाला.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे व शालेय समिती अध्यक्ष रजनीगंधा खांडगे यांनी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देत बालदिंडी उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी संस्था उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, बाळासाहेब शिंदे, मिलिंद शेलार, जयश्री जोशी, शबनम खान, मुख्याध्यापिका शमशाद शेख, विलास काळोखे, जयश्री शिंदे, विन्सेंट सालेर आदी उपस्थित होते.
दिंडी उपक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका यांचेसह पर्यवेक्षिका रेणू शर्मा, रूपाली कांबळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन धनश्री पाटील यांनी केले.

PNE22T06319