महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या मध्यवर्ती महिला 
तक्रार निवारण समितीची पुनर्रचना
महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना

महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, समितीच्या उर्वरित आठ सदस्यपदासाठी विविध अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
महापालिका सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ नुसार ही समिती पालिकेने स्थापन केली आहे. समितीवर अध्यक्ष व सदस्य असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानांतर, पदोन्नती, निवृत्ती व प्रशासकीय कामकाज विचारत घेऊन समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
सहआयुक्त दुरगुडे या अध्यक्ष आहेत. तर, समिती सदस्य सहायक आयुक्त सुषमा शिंदे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, लघुलेखक सुनीता पळसकर आहेत. कर्मचारी महासंघ प्रतिनिधी म्हणून उपलेखापाल शुभांगी चव्हाण या आहेत. अशासकीय संस्था सदस्य म्हणून जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठानच्या कविता खराडे आहेत. समिती सदस्य सामान्य प्रशासन विभागप्रमुख आणि आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. सदस्य सचिव कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आहेत, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढले आहेत.