गोवर साथ उद्रेक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवर साथ उद्रेक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन
गोवर साथ उद्रेक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन

गोवर साथ उद्रेक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः गोवर साथ उद्रेक प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सोमवार (ता. २१) सभा घेतली. या सभेला पिंपरी चिंचवड शहरातील आय.एम.ए., निमा, आय.ए.पी., संघटनांचे प्रतिनिधी व खासगी बालरोगतज्ज्ञ, मनपा रुग्णालयातील बालरोगतज्ञ (आस्थापना मानधन सर्व), पी.जी.आय., य.च.स्मृ. रुग्णालय व डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग
विभागप्रमुख, मनपा दवाखाना, रुग्णालयातील प्रभारी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर (जागतिक आरोग्य संघटना) डॉ. चेतन खाडे यांनी उपस्थित ९० वैद्यकीय व्यावसायिकांना रोगप्रतिबंधक उपाययोजना व घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले.