दुचाकी घेतली... परंतु, हेल्मेट मिळत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी घेतली... परंतु, हेल्मेट मिळत नाही
दुचाकी घेतली... परंतु, हेल्मेट मिळत नाही

दुचाकी घेतली... परंतु, हेल्मेट मिळत नाही

sakal_logo
By

दसऱ्याच्या मुहूर्तावर इंद्रायणीनगर रोड, एस ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी या ठिकाणी असलेल्या दुचाकी शोरूमधून आम्ही दुचाकी खरेदी करण्यासाठी गेलो. दुचाकीसोबत सर्व ॲसेसरीज मिळतात. त्यात हेल्मेटही दिले जाते. परंतु, आम्हाला हेल्मेट मिळालं नाही, हेल्मेटसाठी वितरकांना जादाचे पैसे द्यावे लागत नाहीत. वितरक म्हणाला, हेल्मेटचे पैसेच घेतले नाहीत. म्हणून, तुम्हाला हेल्मेट दिले नाही. एकीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असताना अशा पद्धतीने वितरकांची वागणूक अपघाताला आमंत्रण देण्याप्रमाणे आहे. अशा दुचाकी वितरकांवर नियमानुसार आरटीओची कारवाई होणे अपेक्षित आहे.
- रेणुका खटावकर, इंद्रायणीनगर, भोसरी