आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे
आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे

आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : शहरातील आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, गंगानगर, विवेकनगर परिसरातील विद्यार्थी, युवक, होतकरू खेळाडूंसाठी स्वतंत्र मोठ्या मैदानाची नितांत गरज आहे. अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या भागात राहत आहे. लोकसंख्या ४० हजारच्यावर गेली आहे. मुलांना खेळण्यासाठी पालिकेचे एकही मैदान नाही. हजारो रुपयांचे शुल्क देऊनही खासगी शाळांमध्येही मैदान उपलब्ध नाही, अशी खंत आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे व्यक्त केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आजची तरुण पिढी टीव्ही, मोबाईल आणि संगणकामध्येच अडकून पडली आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदाने नसल्यामुळे कुठे खेळायचे, असा प्रश्न त्यांना पडतो. मैदानी खेळ आणि इनडोअर खेळांची या परिसरातील मुलांना आवड आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या क्रीडा धोरणात सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता हा केंद्रबिंदू ठरवण्यात आला होता. अ क्षेत्रीय प्रभागासाठी मागील वीस वर्षांत महापालिकेने कोणतेही क्रीडाधोरण राबविलेले नाही. युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी महापालिकेने नवीन मैदाने विकसित करावीत. त्यासाठी, मोकळे भूखंड आरक्षित करून विशेष अंदाजपत्रकात तरतूद करावी.