घरकुलमधील मतदार यादीचा ‘खेळ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरकुलमधील मतदार यादीचा ‘खेळ’
घरकुलमधील मतदार यादीचा ‘खेळ’

घरकुलमधील मतदार यादीचा ‘खेळ’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : घरकुलमधील मतदार यादीचा खेळ सुरू आहे. या भागातील अनेक लोकांची नावे इतर प्रभागात नोंदविण्‍यात आली आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक घरकुलमधील मतदान घटवले जाते, का असा नागरिकांचा प्रश्‍न आहे. एकंदरीत आता घरकुलमधील जवळपास ११ ते १३ हजार मतदारांची नोंद व्हायला पाहिजे होते. परंतु ती दिसत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
घरकुल-चिखली या ठिकाणी २०१४ पासून लोक स्थायिक आहेत. आजपर्यंत जवळपास २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. गेली आठ वर्षांत मतदान नोंदणी जाणीवपूर्वक केली जात नाही. मतदार नोंदणी ज्या प्रमाणात पाहिजे. त्यातुलनेत होत नाही. परंतु या ठिकाणचे मतदान नोंदणी फक्त चार-पाच हजार दाखवत आहेत. त्यामुळे येथील व्यवस्थित नोंदणी झालेली नाही. बऱ्याच लोकांची नावे नोंद करून सुद्धा दुसऱ्या प्रभाग केलेले आहेत. घरकुलमधील भाग यादी क्रमांक १४० ते १५० पर्यंत जास्तीत जास्त लोकांची नावे ही घरकूलमधील नोंद झालेली आहे. परंतु या याद्यांमधील घरकुलमधील नावही प्रभाग १५, १४ व १३ मधील मतदारांची नावे प्रभाग दोन प्रभाग एक प्रभाग तीनमध्ये सापडत आहेत. १४९ या यादीमध्ये घरकूलमधील जवळपास साडेपाचशे मतदान प्रभाग क्रमांक पंधरामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या मतदान दुसऱ्या प्रभागात जाण्याचा उद्देश काय हे अजून आम्हाला कळाले नाही. त्यामुळे घरकूलमधील आधारकार्ड पत्ता असणारे सर्व नागरिकांना घरकूलमध्ये मतदान करण्यासाठी द्यावे, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.


‘‘मी पूर्वी भोसरीमध्ये राहत होतो. तिथे आम्हा पती-पत्नीची नावे मतदार यादीमध्ये होते. २०१६ पासून घरकूलमध्ये राहत असून, मी तीन वेळेस पत्ता बदल करणे करीत जात आहे. मी अर्ज दिला आहे. परंतु पत्नीचा पत्ता बदलला. पण माझे नाव भोसरीमध्येच राहिले आहे. सोबत मुलीचे नवीन नाव टाकले. प्रभाग १२ घरकुलला येणे अपेक्षित असताना ते प्रभाग १४ मध्ये ऑनलाइन दिसत आहे. त्यामुळे एका कुटुंबातील तीन मते ही तीन ठिकाणी करावे लागणार आहेत. हे कितपत योग्य आहे.’’
- सुरेश बोरुडे, स्थानिक घरकूल वसाहत

‘‘वारंवार अधिकाऱ्यांना सांगितले जात आहे. या प्रभागातील लोकांची नोंदणी दुसरीकडे होत आहे.’’
- अशोक मगर, स्थानिक घरकूल वसाहत

‘‘मी घरकुलला २०१५ राहायला आलो. त्यानंतर आम्ही आमचे मतदान घरकुलाला केले. २०१७ ला मतदान आम्ही महापालिका निवडणुकीत घरकूल केले. परंतु आता ते मतदान तपासले केले असता आमच्या घरातील तीन मतदान हे प्रभाग क्रमांक १५ मध्ये गेले व एक प्रभाग क्रमांक १२ मध्ये राहिले आहेत.’’
- शरद फडतरे, स्थानिक घरकूल वसाहत